शरद पवारांच्या 'तुतारी'ला निवडणुकीत अपयश, चिन्हाचा 'या' लोकांना झाला फायदा
🎬 Watch Now: Feature Video
Published : 3 hours ago
ठाणे : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरदचंद्र पवार) तुतारी हे चिन्हं देण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर तुतारी वादन करणाऱ्या वादकांसाठी आता 'अच्छे दिन' आल्याचं पहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या तुतारीला काही प्रमाणात यश मिळालं असलं तरी विधानसभा निवडणुकीत मात्र तुतारी अपयशी झालेली पाहायला मिळाली. मात्र, या दोन्ही निवडणुकींच्या प्रचारादरम्यान तुतारी वादक कलाकारांना मोठी मागणी आली होती. राज्यभरातील सर्वच तुतारी वादकांना प्रचारावेळी चांगलीच आर्थिक मदत झाली. एका कार्यक्रमाचे पाच ते दहा हजार असे मानधन या कलाकारांना मिळते. तर विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी महापालिका निवडणुकीत याच तुतारीचा वापर राष्ट्रवादीला (शरदचंद्र पवार) करावा लागणार आहे. त्यामुळं याचा फायदा पुन्हा एकदा तुतारी वादकांना होणार आहे.