हैदराबाद : Tata Motors Ltd च्या वाहन विक्रीत नोव्हेंबरमध्ये किंचित वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या 74 हजार 172 युनिट्सच्या तुलनेत 74 हजार 753 युनिट्सवर पोहोचली आहे. तसंच कंपनीनं देशांतर्गत विक्रीत 1% वाढ केली आहे. कंपनीची देशांतर्गत विक्री 73 हजार 246 युनिट्सची विक्री केलीय. ईव्हीसह प्रवासी वाहनांची विक्री 2% नं वाढून 47 हजार 117 युनिट झालीय, तर व्यावसायिक वाहनांची विक्री 1% वरून घसरून 27 हजार 636 युनिट्सवर आलीय.
Tata Motors Sales Release - November 2024
— Tata Motors (@TataMotors) December 1, 2024
Click the link to know more - https://t.co/9As82wiTUn#TataMotors #ConnectingAspirations pic.twitter.com/UUoimcn4ss
नोव्हेंबरमध्ये एकूण विक्रीत किरकोळ वाढ : Tata Motors Ltd नं रविवारी नोव्हेंबरमध्ये एकूण विक्रीत किरकोळ वाढ नोंदवली आहे. नोव्हेंबरमध्ये कंपनीनं 74 हजार 753 युनिट्सची विक्री केलीय. गेल्या वर्षी कंपनीनं याच महिन्यात 74 हजार 172 युनिट्सची विक्री केली होती.
प्रवाशी वाहनाची विक्री 2 टक्क्यांनी वाढली : त्याचप्रमाणे, ईव्हीसह (इलेक्ट्रिक वाहन) देशांतर्गत पीव्ही (passenger vehicle sales) विक्री नोव्हेंबर 2023 मध्ये 46 हजार 68 युनिट्सच्या तुलनेत 2 टक्क्यांनी वाढून 47 हजार 063 युनिट्सवर पोहोचलीय.
व्यावसायिक वाहनांची विक्री 1 टक्क्यांनी घसरली : गेल्या महिन्यात एकूण व्यावसायिक वाहनांची विक्री 1 टक्क्यांनी घसरून 27 हजार 636 युनिट्सवर आली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 28 हजार 29 युनिट होती. ईव्हीसह एकूण प्रवासी वाहन (passenger vehicle sales) विक्री 47 हजार 117 युनिट्स होती, जी मागील वर्षीच्या 46 हजार 143 युनिट्सच्या तुलनेत टक्क्यांनी वाढली आहे.
हे वाचलंत का :