एकनाथ शिंदे वेगळं रसायन, नाराज हा शब्द त्यांच्या जीवनात नाही- गुलाबराव पाटील - GULABRAO PATIL ON EKNATH SHINDE
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/01-12-2024/640-480-23017835-thumbnail-16x9-gulabrao-patil.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Dec 1, 2024, 1:45 PM IST
जळगाव : राज्यात नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (29 नोव्हेंबर) अचानक आपल्या दरे (ता. महाबळेश्वर) गावी दाखल झाले. गावी आल्यापासून त्यांनी कोणाचीही भेट घेण्याचं टाळलं. खातेवाटपावरुन ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आजारी असल्यामुळं त्यांनी शनिवारी (30 नोव्हेंबर) राजकीय नेत्यांसह माध्यमांची भेट टाळली. तर मिळालेल्या माहितीनुसार महायुतीच्या बैठकीसाठी ते आज (1 डिसेंबर) मुंबईत येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "एकनाथ शिंदे हे एक वेगळं रसायन असून नाराज हा शब्द त्यांच्या जीवनात नाही. त्यांनी यापूर्वी फार खडतर प्रवास केलाय. अडीच वर्षांमध्ये लोकांनी त्यांना भरभरुन प्रेम दिलंय. त्यामुळं ते नाराज राहण्याचा प्रश्नच येत नाही. तसंच आजारी असले तरी एकनाथ शिंदे हे मुंबईत होणाऱ्या बैठकीला नक्की येणार," असंही ते म्हणाले.