ETV Bharat / state

कथित पॉर्नोग्राफी प्रकरण : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीचं समन्स, आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश - ED SUMMONS RAJ KUNDRA

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला ईडीनं समन्स बजावून आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कथित पोर्नोग्राफी प्रकरणत मनी लाँड्रींगचा आरोप ईडीनं केला.

ED Summons Raj Kundra
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2024, 10:36 AM IST

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती तथा उद्योगपती राज कुंद्रा याला ईडीनं समन्स पाठवलं आहे. कथित पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राची चौकशी करण्यासाठी हे समन्स पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज कुंद्रा याच्या घरावर आणि कार्यालयात टाकलेल्या छाप्यानंतर ईडीनं राज कुंद्राला चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. राज कुंद्रा सोबतच या प्रकरणातील इतर आरोपींना देखील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं. या समन्सनुसार आज राज कुंद्रा आणि इतर आरोपींना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.

ED Summons Raj Kundra
राज कुंद्राची सोशल माध्यमात स्टोरी (Reporter)

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीचं समन्स : कथित पोर्नोग्रफी प्रकरणात राज कुंद्रासह सर्व सहआरोपी जामीनावर बाहेर असून, आता पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला क्रिप्टोकरन्सी प्रकरणात ईडीनं राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणात दिलासा दिला. आता पुन्हा राज कुंद्रा आणि सहआरोपींची आज चौकशी होणार असून या चौकशीत कोणती नवी माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज कुंद्रा यांनी सोशल माध्यमात लिहिली पोस्ट : राज कुंद्रा यांनी ईडीच्या समन्सनंतर सोशल माध्यमात स्टोरी शेयर केली. या स्टोरीत त्यानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं लिहिले, "गेल्या चार वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मी सुरुवातीपासून या तपासात सहकार्य करत आहे. या प्रकरणाबद्दल एवढेच म्हणता येईल, की कोणीही सत्य लपवू शकत नाही. शेवटी न्यायाचा विजय होईल. या प्रकरणात माझ्या पत्नीचं नाव देखील वारंवार माध्यमांमध्ये प्रसिद्ध केलं जात आहे. या प्रकरणाशी तिचा कोणताही सबंध नाही. त्यामुळे माध्यमांनी मर्यादा पाळाव्यात."

हेही वाचा :

  1. राज कुंद्राच्या घरावर ईडीची छापेमारी, पॉर्नोग्राफी प्रकरणात छापेमारी करण्यात आल्याची माहिती
  2. अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राविरोधात तपास करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे पोलिसांना आदेश, नेमकं प्रकरण काय? - Shilpa Shetty
  3. ईडीने ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्यानंतर राज कुंद्राची गूढ पोस्ट - Raj Kundra

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.