ETV Bharat / state

लाडकी बहीण योजनेचा लाभ बांगलादेशी महिलांना? कामाठीपुरा येथून बांगलादेशी महिलेला अटक - LADKI BAHIN YOJANA

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा बांगलादेशी महिलेनं बनावट कागदपत्रे सादर करून लाभ घेतल्याचं स्पष्ट झालं. तिला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

LADKI BAHIN YOJANA
लाडकी बहिण योजना (संग्रहित छायाचित्र) (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2025, 5:14 PM IST

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तळागाळातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळू लागले. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील गरजू व पात्र महिलांसाठी राबवण्यात येते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या योजनेचा लाभ चक्क बांगलादेशी महिलेनं घेतल्याचं समोर आलं आहे.

मुंबईतील कामाठीपुरा इथं राहणाऱ्या बांगलादेशी महिलेनं बनावट कागदपत्रं सादर करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याच्या आरोपावरून तिला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली. सध्या या महिलेची चौकशी सुरू असून या योजनेचा लाभ तिने कसा घेतला, त्यासाठी कोणती बनावट कागदपत्रं सादर केली, भारतात वास्तव्य करत असताना त्यांच्याकडे कोणती अधिकृत कागदपत्रं आहेत? की ते चुकीच्या पद्धतीनं भारतात राहत आहेत, त्याबाबतचा तपास गुन्हे शाखा करत आहे.

याप्रकरणी तीन बांगलादेशी महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका दलालाला देखील अटक करण्यात आली आहे. या दलालानं बनावट कागदपत्रं बनवण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. बांगलादेशातून अवैधरित्या भारतात येऊन बेकायदा पद्धतीनं राहण्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात नोंदवण्यात आला.

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चोरी करणाऱ्या आणि त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. पोलिसांच्या तपासात तो आरोपी बांगलादेशी असल्याचं समोर आलं. त्यामुळं एकूणच मुंबई व राज्यातील बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली. केंद्रीय गृहमंत्रालयानं देखील महाराष्ट्राला याबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार चित्रा वाघ आणि इतर नेत्यांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात सरकारनं पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये पारपत्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा करत असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी दिली.

हेही वाचा :

  1. लाभार्थी लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार नाही, मात्र ज्यांनी...; अदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
  2. दादा कन्फ्युज! अजित पवारांच्या 'त्या' विधानाचा एकनाथ खडसे यांच्याकडून समाचार
  3. सैफ अली खान हल्ला प्रकरण; डावकी नदीत पोहून घुसला भारतात, शरीफुल इस्लामचा कसा झाला 'विजय' ?, जाणून घ्या आरोपीची मोडस ऑपरेंडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.