नवी मुंबई India Masters vs England Masters T20 : इंडिया मास्टर्स क्रिकेट संघानं सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात अतिशय शानदार पद्धतीने केली. 22 फेब्रुवारी रोजी श्रीलंका मास्टर्सविरुद्धच्या सामन्यात 4 धावांनी विजय मिळवून त्यांनी पॉइंट टेबलमध्ये आपलं खातं उघडलं आहे. आता इंडिया मास्टर्स संघाला या T20 लीगमधील आपला दुसरा सामना आज 25 फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड मास्टर्स संघाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा महान फलंदाज सचिन तेंडुलकरवर असतील, ज्याच्याकडून सर्व चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
Nice surprise filled with dher sara pyaar! ❤️
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 24, 2025
Thank you Team. pic.twitter.com/ovwQXfXVNX
इंडिया मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्समधील सामना मोफत कसा पाहायचा : आयएमएल T20 मध्ये इंडिया मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स यांच्यातील हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल, जिथे या स्पर्धेचे आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत आणि दोन्हीमध्ये फलंदाजांचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून आलं आहे. अशा परिस्थितीत, चाहते या सामन्यातही मोठ्या धावसंख्येची अपेक्षा करु शकतात. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. भारतीय चाहते हा सामना टीव्हीवर कलर्स सिनेप्लेक्स आणि कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट्सवर थेट पाहू शकतात. तसंच चाहते जिओ हॉटस्टार अॅपवर सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत ऑनलाइन पाहू शकतात, जिथं ते इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत समालोचनाचा आनंद घेऊ शकतील.
𝐌𝐚𝐬𝐭𝐞𝐫𝐬 𝐃𝐨𝐧’𝐭 𝐉𝐮𝐬𝐭 𝐏𝐥𝐚𝐲, 𝐓𝐡𝐞𝐲 𝐃𝐨𝐦𝐢𝐧𝐚𝐭𝐞!💥#IndiaMasters & #EnglandMasters lock horns in what promises to be a 𝘁𝗵𝗿𝗶𝗹𝗹𝗲𝗿! 😍💪#IMLT20 #TheBaapsOfCricket #IMLonJioHotstar #IMLonCineplex pic.twitter.com/LXMysjro22
— INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) February 25, 2025
इंडिया मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स संघाची टीम :
इंडिया मास्टर्स : अंबाती रायुडू (यष्टीरक्षक), सचिन तेंडुलकर (कर्णधार), गुरकीरत सिंग मान, स्टुअर्ट बिन्नी, युवराज सिंग, युसूफ पठाण, इरफान पठाण, शाहबाज नदीम, विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, धवल कुलकर्णी, सुरेश रैना, नमन ओझा, राहुल शर्मा, पवन नेगी.
𝓦 secured! ✅🔥#IndiaMasters start their campaign in style, edging out the win by 4️⃣ runs! 💪🏏💙#IMLT20 #TheBaapsOfCricket #IMLonJioHotstar #IMLonCineplex pic.twitter.com/32vXWT2UCw
— INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) February 22, 2025
इंग्लंड मास्टर्स : इऑन मॉर्गन (कर्णधार), फिल मस्टर्ड (यष्टीरक्षक), केविन पीटरसन, डॅरेन मॅडी, इयान बेल, टिम अॅम्ब्रोस, दिमित्री मस्कारेनहास, टिम ब्रेसनन, मोंटी पनेसर, स्टुअर्ट मीकर, बॉयड रँकिन, ख्रिस स्कोफिल्ड, ख्रिस ट्रेमलेट, रायन जे साइडबॉटम, स्टीव्हन फिन.
The first ever Man of the Match of the #IMLT20 – 𝐒𝐭𝐮𝐚𝐫𝐭 𝐁𝐢𝐧𝐧𝐲! 🏆
— INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) February 22, 2025
A stellar performance with the bat, scoring 68 in just 31 balls and leading #IndiaMasters to a thrilling victory! 🏏👏#TheBaapsOfCricket #IMLonJioHotstar #IMLonCineplex #MOTM pic.twitter.com/Wpo9ppVG1u
हेही वाचा :