हिंगणघाट जळीतकांड : अखेर 'ती'ची झुंज संपली; सोमवारी घेतला अखेरचा श्वास
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी)ला प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज आठव्या दिवशी सोमवारीच तिची मृत्यूशी झुंज संपली. आज (सोमवारी) सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.