विधानसभा निवडणूक 2024; "वरळीत काटे की टक्कर", कोण मारणार बाजी?
🎬 Watch Now: Feature Video
Published : 4 hours ago
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील 288 मतदारसंघात कोणते उमेदवार विजयी होणार? महाविकास आघाडी की महायुती सत्तेत येणार हे आज स्पष्ट होणार आहे. तर मुंबईत टपाल मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्याच अवधीमध्ये ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबईतील एकूण ३६ मतदारसंघांपैकी १२ मतदारसंघांमध्ये थेट दोन्ही शिवसेनेमध्ये लढत होत आहे. मुंबईवर सत्ता कोणाची "उद्धव ठाकरे की, एकनाथ शिंदे" यांचा फैसला आज होणार आहे. भायखळा, शिवडी, वरळी, माहीम हे शिवसेनेचे बालेकिल्ले राहिले आहेत. हे बालेकिल्ले टिकवण्यासाठी दोन्ही सेनेमध्ये चुरस आहे. आज सगळ्यांना निकालाची उत्सुकता लागलीय. निकालानंतर कुणाचं सरकार येईल हे आज स्पष्ट होईल. तर मुंबईतील वरळी या मतमोजणी केंद्रातून निकालाचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.