ETV Bharat / spiritual

12 राशींसाठी कसा राहील नोव्हेंबर शेवटचा आठवडा?; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - WEEKLY HOROSCOPE

मेष ते मीन राशींसाठी नेमका कसा असणार नोव्हेंबरचा आठवडा, जाणून घेण्यासाठी वाचा साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2024, 3:05 AM IST

मेष (Aries) : या आठवड्याचा उत्तरार्ध, पूर्वार्धा पेक्षा उन्नतीदायक आणि लाभदायी होण्याची संभावना आहे. विविध कार्यात अडथळे येऊन सुद्धा आपण यशस्वी व्हाल. प्रेमसंबंध दृढ होण्याची शक्यता आहे. आपली मधुर वाणी आपल्या कामात सुधारणा करण्यास मदत करेल. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. जोडीदाराच्या सहवासात वेळ घालवल्यानं आपले नाते आणि भावना दृढ होतील. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यच आहे. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपणास आपल्या परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागेल. आठवड्याच्या मध्यास कार्यक्षेत्री संघर्षास सामोरे जावे लागू शकते, परंतु, त्या नंतर कार्य सिद्धी होऊ शकते. अशा प्रसंगी आपणास धीर आणि सहनशीलता बाळगावी लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळण्याची संभावना आहे. ईश्वरा प्रति आपली आस्था आणि विश्वास वाढेल. भावनेच्या आहारी जाऊन किंवा कोणाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेणे टाळावे. धीर धरा आणि आपल्या लक्ष्यांकाच्या दिशेने मार्गक्रमण करा.

वृषभ (Taurus) : या आठवड्यात आपणास काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी आपणास सावध राहावं लागेल. राग आणि आवेशास थारा देऊ नका. लहान-सहान गोष्टींकडं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासाठी संपत्ती खरेदी - विक्रीची आपली कामना पूर्ण होऊ शकते. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. आपण आणि प्रेमिके दरम्यान काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्याचे प्रयत्न केल्यास समाधान होऊन प्रणयी जीवनात सुधारणा होऊ शकेल. वैवाहिक जोडीदारासह एखादा दूरवरचा प्रवास संभवतो. मातेच्या प्रकृती विषयी आपण काहीसे चिंतीत होऊ शकता. स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या ऊत्तरार्धा पर्यंत खुश खबर मिळू शकते. वादांचं निराकरण करण्यास मदत मिळू शकते. ह्या आठवड्यात आपल्याला संघर्षास सामोरे जाण्याची गरज भासेल. आपणास समर्थन मिळू शकते, जे आपणास समस्यांचे निराकरण करण्यास मदतरूप ठरू शकेल. ह्या आठवड्यात स्वतःला संतुलित ठेवण्यासाठी व संबंध टिकवून ठेवण्यासाठी आपणास आपल्या विचारांवर आणि वागणुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपली प्रकृती आणि सामाजिक संबंध आपल्या जीवनातील सुख आणि समृद्धीचे मूळ असते हे ध्यानात ठेवावे.

मिथुन (Gemini) : या आठवड्यात आपली कामे आणि जीवन रहाट यांची गती संथ होईल. अपेक्षित कामे वेळेवर न झाल्यानं आपलं मन बेचैन होईल. कार्यक्षेत्री सुद्धा कामाचा ढीग तयार होईल. अशा प्रसंगी वेळेवर काम करण्याचा आणि आपल्या कामातील वेळेकडं लक्ष देण्याचा प्रयत्न करा. ह्या आठवड्यात आपण कोणावर ही अवलंबून राहू नये. वेळेवर कोणाची मदत न मिळाल्यानं आपल्या पदरी निराशा येऊ शकते. स्वतः आत्मनिर्भर व्हा. स्वतःच समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करा. प्रणयी जीवनात लटके वाद संभवतात. आपल्या प्रेमिकेस एखादी भेटवस्तू देऊन आपण प्रेमिकेचा राग दूर करू शकता. पती - पत्नी दरम्यान प्रेम आणि सामंजस्य टिकून राहील. मुलांच्या खुशीसाठी थोडा जास्त खर्च करावा लागू शकतो. आहाराकडं विशेष लक्ष द्यावं. आपल्या पोटाच्या तक्रारींकडं विशेष लक्ष द्यावं. आपणास जर एखादी आर्थिक समस्या भेडसावीत असेल तर आठवड्याच्या पूर्वार्धात तिचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. जमीन-घर किंवा वाहन यांच्या खरेदी - विक्रीची योजना काही काळासाठी पुढे ढकलली जाण्याच्या शक्यतेमुळं वेळेवर योजना तयार करून धैर्याने वाटचाल करा.

कर्क (Cancer) : या आठवड्यात आपणास अधिक सतर्क आणि सावध राहावं लागेल. आपल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न जे करू शकतात अशा लोकांपासून आपणास दूर राहावे लागेल. प्रणयी जीवनात सुद्धा आपणास सावधपणे वाटचाल करावी लागेल. जोशात येऊन आपली शुद्ध हरपणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारे विवेक आणि संवेदनतेसह कामे करावी लागतील. आठवड्याच्या सुरूवातीस व्यवसायानिमित्त आपणास प्रवास करावा लागू शकतो. कोणतीही मोठी जवाबदारी पत्करण्या पूर्वी आपल्या परिस्थितीचा विचार करावा लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात वरिष्ठांच्या मदतीने कार्यक्षेत्री येऊ घातलेल्या समस्यांचं समाधान होण्याची संभावना आहे. त्यामुळं आपल्या मनास काहीसा दिलासा मिळेल. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीमुळं चिंतीत होणे टाळावे लागेल. त्यांना सहकार्य करणे चालूच ठेवावे.

सिंह (Leo) : हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आणि सौभाग्यदायी होण्याची संभावना आहे. कारकीर्द आणि व्यवसायास पुढे घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊन आपणास प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाऊ शकते. प्रेमसंबंध सुद्धा प्रगल्भ होऊ शकतील. आपल्या प्रणयी जीवनाचे रूपांतर विवाहात होऊ शकते. त्यामुळं कुटुंबियांना आपल्या प्रणयी जीवनाचा स्वीकार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. दांपत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदाराशी आपले संबंध सुख - समृद्धीने भरलेले राहील. ह्या आठवड्यात युवकांची संगीत, कला, नृत्य इत्यादीत रुची वाढून त्यांना संबंधित क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते. जमीन - घर, वाहन इत्यादींची खरेदी-विक्रीची इच्छा पूर्ण होऊ शकेल. आपणास आपल्या स्वप्नातील घर किंवा संपत्ती निर्माणासाठी समर्थन मिळू शकते. हा आठवडा परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ फलदायी असू शकतो. त्यांना त्यांच्या अध्ययनात व स्पर्धेच्या तयारीत यश मिळू शकते. त्यांना आपल्या मित्रांसह मस्ती करण्यासाठी भरपूर वेळ मिळू शकतो. आपणास आपले मित्र आणि कुटुंबियांसह सुद्धा आनंद आणि सहकार्याचा अनुभव येईल. हा आठवडा आपण सुख, समृद्धी आणि यशासह घालवाल.

कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यासाठी काहीसा धावपळीचा आणि आव्हानात्मक होऊ शकतो. कामानिमित्त लहान - मोठे प्रवास करावे लागू शकतात, ज्यात आपणास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रणयी जीवनात आपणास प्रेमिकेशी एकनिष्ठ राहावे लागेल. वाद टाळण्यासाठी सर्व मुद्दे समजून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करावा. कार्यक्षेत्री कामाचा भार राहील, तेव्हा आपले लक्ष्य गाठण्यासाठी आपण वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्याशी मिळून-मिसळून कामे करणे हितावह होईल. आपणास आपल्या आर्थिक बाबीत योजनाबद्ध वाटचाल करावी लागेल. असे केल्यासच आपणास लाभ मिळू शकेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा उबग येण्याची संभावना असल्यानं त्यांना त्यात लक्ष घालावं लागेल. व्यापारात अपेक्षित लाभ न झाल्यानं आपण हताश होण्याची संभावना आहे. मात्र, सकारात्मक चिंतनासह आपली उन्नती आणि प्रगती होईल. आपणास पोटाचे विकार होण्याची संभावना असल्यानं आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेऊन स्वस्थ जीवनशैली अंगीकारावी.

तूळ (Libra) : हा आठवडा आपणास चांगला असण्याची शक्यता असून आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. वरिष्ठांच्या कृपेने आणि समर्थनाने आपल्या कार्यक्षेत्री उन्नती होण्याची संभावना असून आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. प्रणयी जीवनात प्रेमिकेच्या भावनांचा आदर राखल्यानं आणि तिच्या वैयक्तिक गरजांकडं सामंजस्य पूर्वक लक्ष दिल्यानं आपले संबंध मधुर होतील. वैवाहिक जीवनात आपणास सुख आणि सहकार्य मिळेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अनुकूल होऊ शकतो. त्यांची अभ्यासातील गोडी वाढून ते अधिक उत्साहित होतील. खरेदी - विक्रीच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास लाभ होईल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात व्यस्त राहिल्यानं आपण संतुष्ट व्हाल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपण धार्मिक कार्यात व्यस्त राहण्याची संभावना आहे. आपणास कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्ती कडून भेटवस्तू मिळण्याचीसंभवना आहे. आहारावर लक्ष ठेवावं. प्रकृतीची काळजी घ्यावी.

वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा आपणास शुभ आणि लाभदायी होण्याची संभावना आहे. आर्थिक बाबतीत यश प्राप्तीसाठी आपणास प्रतीक्षा करावी लागेल. व्यवसायात आणि नोकरीत अप्रत्यक्षपणे लाभ प्राप्ती संभवते. आपले प्रेमसंबंध सुखद आणि प्रगल्भ होण्याची संभावना आहे. वैवाहिक जोडीदारासह समृद्धी आल्याने आपण अत्यंत खुश व्हाल. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा ठरेल. त्यामुळं आपली समृद्धी वाढू शकते. सामान्य लाभ सुद्धा संभवतो. आपण सढळहस्ते पैसा खर्च कराल. आपणास आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी योजनाबद्ध राहून काम करावे लागेल. आपणास आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवावं लागेल. ह्या आठवड्यात धनलाभासह खर्च सुद्धा संभवतो. हा आठवडा आर्थिक उन्नतीचा आणि समृद्धीचा असल्यानं आपणास आर्थिक बाबतीत सक्रिय राहावं लागेल. हा आठवडा प्रकृतीच्या दृष्टीनं सुद्धा चांगला आहे.

धनु (Sagittarius) : या आठवड्यात आपणास विचारपूर्वक आणि विवेकपूर्वक पाऊल उचलावे लागेल. कार्यक्षेत्री लोकांच्या लहान - सहान गोष्टी दुर्लक्षित करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल, अन्यथा नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक क्षेत्रात विचारपूर्वक गुंतवणूक करणे हितावह होईल. कुटुंबाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबीयांचा सल्ला घेणे हितकारक होईल. विशेषतः संपत्तीशी संबंधित वादाचं निराकरण करताना विचारपूर्वक काम करावे लागेल. भावंडांशी योग्य व्यवहार केल्यास कुटुंबातील सदभावना टिकून राहील. आपले प्रणयी जीवन सुखद आणि मधुर असेल. प्रणयी जीवनात पाऊल सावकाश उचलावे, भावनात्मक समन्वय साधणे हितकारक होईल. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. कठीण प्रसंगी आपला वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी राहून आपणास मदत करेल. हा आठवडा आपल्यासाठी अनेक संघर्ष व चढ - उतार घेऊन आला तरी विवेकपूर्वक पाऊल उचलून आणि सामंजस्य दाखवून निर्णय घेतल्यास आपण अनुकूल परिणाम प्राप्त करू शकाल.

मकर (Capricorn) : हा आठवडा आपल्यासाठी जास्त आव्हानात्मक असल्यानं एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्या बोलण्यानेच गोष्टी अनुकूल किंवा प्रतिकूल होऊ शकतात. ह्या आठवड्यात आपणास आपली कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त श्रम करावे लागतील. वेळेवर मित्र किंवा सहकाऱ्यांची मदत न झाल्यानं मन काहीसे उदास आणि त्रासून जाऊ शकते. ह्या आठवड्यात महत्वाच्या कामात परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतील. आपले प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी आपल्या प्रेमिकेच्या भावना दुर्लक्षित करू नका. आपण कौटुंबिक जवाबदारीतून पळ काढण्याची चूक करू नये. तसेच अति भावनाशील होऊ नये. व्यवसायात कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नये. आठवड्याच्या अखेरीस कामानिमित्त दूरवरच्या प्रवासाची योजना करावी लागू शकते. आरोग्य विषयक तक्रारी उदभवण्याची शक्यता असल्यानं आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

कुंभ (Aquarius) : आपण ह्या आठवड्यात कारकिर्दीत आणि व्यवसायात कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नये. त्याच प्रमाणे नोकरीत बदल सुद्धा विचारपूर्वकच करावा. आपणास आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन त्यानुसार गरजांना प्राधान्यक्रम द्यावा लागेल. कोणत्याही प्रकारे कर्ज काढावे लागणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच अंदाजपत्राप्रमाणे खर्च करावेत, अन्यथा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ह्या आठवड्यात आपणास इतरांशी वागताना सुद्धा सावध राहावे लागेल. विशेषतः इतरांशी थट्टा - मस्करी करताना आपल्या मान-प्रतिष्ठेचा विचार करून इतरांच्या भावना दुखावणार नाहीत ह्याची काळीज घ्यावी लागेल. प्रणयी जीवनात सुद्धा आपणास सावध राहून पाऊल उचलावे लागेल. दांपत्य जीवनात आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा. जोडीदाराच्या सहवासात थोडा वेळ घालवून आपले नाते समृद्ध करावे. विद्यार्थ्यांना अध्ययनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

मीन (Pisces) : हा आठवडा आपणास यश प्राप्त करून देणारा आहे. आपल्या कारकिर्दीत आणि व्यवसायात उन्नती होण्याची शक्यता असल्याचं दिसत आहे. ह्या दरम्यान आपणास आपल्या मित्रांसह काम करावे लागेल. त्यामुळं आपणास चांगला लाभ सुद्धा होईल. आपले दांपत्य जीवन समृद्ध होण्याची चिन्हे दिसत आहेत. वैवाहिक जोडीदारासह एखादा दीर्घ पल्ल्याचा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळं आपले नाते अधिक दृढ होऊ शकेल. ह्या दरम्यान प्राप्तीचे नवीन स्रोत सुद्धा मिळू शकतात. कुटुंबातील आनंद वृद्धिंगत होऊ शकेल. प्रकृतीच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यच आहे. तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी. नियमित व्यायाम, सकस आहार, योग्य विश्रांती यासह आपल्या प्रकृतीकडं लक्ष द्यावे. प्रेम संबंधात प्रगल्भता आणि सुखद वातावरण असल्याचं दिसत आहे. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालवणे आपल्यासाठी खास आणि आनंददायक होईल. कुटुंबात सौहार्दता वाढत असल्याचं दिसत आहे. आई-वडिलांशी आपले संबंध सदैव समृद्ध आणि सामंजस्यपूर्ण राहतील.

हेही वाचा -

कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.