पालघर : चक्रीवादळाचा धोका कायम, रात्री 8 वाजेपर्यंत पालघरमध्ये हाय अलर्ट - palghar tauktae cyclone high alert

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 17, 2021, 6:22 PM IST

पालघर - जिल्ह्यात अजूनही तौक्ते चक्रीवादळाचा धोका कायम आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून रात्री 8 वाजेपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्याच्या पालघर, डहाणू येथील किनारपट्टी भागासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे जव्हार, विक्रमगड भागात अनेक दुकान आणि घरांवरील छपर उडाली आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज पालघर महावितरण विभागात एकूण ९३ वीज वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन १ लाख ९८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस व वाऱ्यामुळे झाडे वीज वाहिन्यावर पडून आज महावितरणचे लघुदाब वाहिनीचे ४९ पोल, उच्च दाब वहिनीचे १९ पोल व १ रोहित्र केंद्राचे नुकसान झाले आहे. तर वीजपुरवठा खंडित झालेल्या ९३ विजवाहिन्यांपैकी ५५ वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. ३८ विजवाहिन्याचा व १२ उपकेंद्राचा वीज पुरवठा युद्ध पातळीवर सुरू करण्याचे काम सुरू आहे. पाऊस व वाऱ्यामुळे कामात अडचणी निर्माण होत आहेत. उर्वरित अंदाजे ९२ हजार ५०० ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणमार्फत करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.