गणपती विसर्जनाला भाविकांचा निरुत्साह...विसर्जन घाटांवर शुकशुकाट - गणेशोत्सव २०२०
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने विसर्जन सोहळा साजरा होत आहे. मुंबईत दरवर्षीप्रमाणे होणारी गर्दी यंदा ओसरली आहे. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूर्व मुंबई उपनगरातील पवई येथील विसर्जन घाटावर देखील शुकशुकाट आहे. पालिका प्रशासनाकडून गणेश मुर्त्या थेट विसर्जन घाटावर न आणता त्या संकलन केंद्रामध्ये सुपूर्द करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे विसर्जन घाटांवर पालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी वगळता कोणीही दिसत नाहीय.