भंडारा बालकं मृत्यू प्रकरण : नेमकी 'कशी' घडली घटना - भंडारा बालकं मृत्यू प्रकरण न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
भंडारा - जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागली. या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री दोन वाजता ही आग लागली. SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालके होती. या विभागामध्ये आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बॉर्नमधील सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. या घटनेचा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी दिपेंद्र गोस्वामी यांनी आढावा घेतला...
Last Updated : Jan 9, 2021, 9:04 AM IST