अमरावती शहराचे शांत रुप ड्रोन कॅमेऱ्यात कैद - अमरावती लॉकडाऊन व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10738841-539-10738841-1614050315737.jpg)
अमरावती - जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. याला काल(सोमवार) रात्री आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. दररोज वाहनांचा कर्कश आवाज, लोकांची गर्दी, खुल्या असलेल्या बाजारपेठा यामुळे गजबजणारी अंबानगरी आज लॉकडाऊनमुळे शांत आहे. वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. अमरावती शहराचे हे शांत रुप ईटीव्ही भारतचे प्रेक्षक अक्षय इंगोले यांनी ड्रोन कॅमेरात टिपले आहे.