thumbnail

By

Published : Apr 18, 2021, 12:37 PM IST

ETV Bharat / Videos

नारायणगावातील गॅस शवदाहिनी कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ठरत आहे वरदान

पुणे - पर्यावरण रक्षणासह आर्थिक खर्च टाळण्यासाठी नारायणगाव ग्रामपंचायतच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली गॅस शवदाहिनी कोरोना काळात अंत्यसंस्कार करण्यासाठी वरदान ठरत आहे. याठिकाणी दररोज पाच ते सात मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. १३ एप्रिलला याठिकाणी एकाच दिवशी १३ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. नारायणगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी इरफान शेख व सहकारी या गॅस शवदाहिनीत रात्रंदिवस नियोजनपुर्वक अंत्यसंस्काराचे काम करत आहेत. नारायणगाव येथे सुरू करण्यात आलेल्या शवदाहिनीत नारायणगाव ग्रामस्थांसाठी मोफत अंत्यविधी केला जातो. तर, इतर गावातील नागरिकांकडून नाममात्र १ हजार ५०० रुपये मानधन घेतले जाते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.