तिसरा श्रावण सोमवार : पांडुरंगाच्या मंदिरात नयनरम्य फुलांची आरास - pandharpur aaras shravan somvar solapur
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12849738-thumbnail-3x2-kk.jpg)
पंढरपूर (सोलापूर) - श्रावण सोमवार निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास तसेच संपूर्ण मंदिरात नयनरम्य अशा 15 प्रकारच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. त्यामुळे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरास फुलांच्या सजावटीमुळे मनमोहक स्वरूप प्राप्त झाले. ही आरास कल्याण येथील शशिकांत मढवी यांनी केली आहे. यात झेंडू, कामिनी, ब्लू डी.जे, टॅटीस, शेवंती, गुलछडी, गुलाब आदी १५ फुलांचे प्रकार व पानांची रंगसंगती वापर करण्यात आली. साधारणतः १ टन फुले वापरण्यात आल्याचे सांगण्यात आले.