पुणे आग दुर्घटना : परिस्थिती अजूनही आटोक्यात नाही; घटनास्थळावरुन 'ईटीव्ही भारत'चा आढावा - pune svs company incident still continue
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला काल (सोमवारी) दुपारी भीषण आग लागली. या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. तर काल दुपारी लागलेली आग ही अजूनही आटोक्यात आली नाही. कंपनीतील काही भागात अजूनही आग सुरूच आहे. कंपनीत अजूनही काही रासायनिक पदार्थ असल्याने आग पुन्हा पेटत आहे. या परिस्थितीत घटनास्थळावरुन ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा.