पावसाचा फटका, शेतकऱ्यांकडून चक्क ड्रोन कॅमेऱ्याने शेतीच्या नुकसानीची पाहणी - जालना महापूर न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
जालना : जिह्यातील घनसावंगी तालुक्याला गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील रामसगाव, शेवता, बानेगाव, भोगगाव, टेंभी अंतरवाली, मुद्रेगाव, पाडोळी, तसेच तीर्थपुरी या गावांना पावसाचा मोठा फटका बसला. गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यात परिसरातील उभी असलेली संपूर्ण पिकं उद्ध्वस्त झाली. आधीच सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेकऱ्यावर हे अस्मानी संकट कोसळले. त्यामुळे प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी परिसरातील पिकांच्या नुकसानीची व्यथा सरकार दरबारी मांडली. यासाठी चक्क ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. अतिवृष्टी झालेल्या गावांना 100 टक्के नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, पंचनाम्यासाठी प्रशासनाचा वेळ वाचावा म्हणून ड्रोनद्वारे केलेले शूटिंग जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळाधीकारी यांना पाठवेले आहे.
Last Updated : Sep 6, 2021, 11:07 AM IST