विशेष रिपोर्ट: गडचिरोलीत बुरसटलेल्या मानसिकतेतून घडली सामूहिक आत्महत्या - आंतरजातीय विवाह गडचिरोली
🎬 Watch Now: Feature Video

जातीव्यवस्था भारतीय संस्कृतीला लागलेली कीड असल्याचे पुन्हा एकदा गडचिरोलीतील सामूहिक आत्महत्येच्या घटनेने अधोरेखित झाले आहे. स्वत:च्या मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून भर दुपारी आई-वडिलांसोबत बारावीत असलेल्या मुलानेही विहिरीत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या केली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने गडचिरोली शहरावर शोककळा पसरली. यावरून आजही जातिव्यवस्थेचे भूत बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या माणसात कायम आहे. कुटुंबातील तिघांनी एवढं टोकाचे पाऊल का उचलावं? याला अशिक्षितपणा म्हणावं की बुरसटलेली मानसिकता हे आजही न समजणारं कोडं आहे.