#covid19: जळगावात 'जनता कर्फ्यू'ला उत्स्फूर्त प्रतिसाद... - जळगाव कोरोना बातमी
🎬 Watch Now: Feature Video
जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरात 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार सकाळ सत्रात जळगाव शहरासह जिल्ह्यात 'जनता कर्फ्यू'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एरवी सकाळपासून घराबाहेर पडणारे जळगावकर रविवारी घरातच थांबून होते. त्यामुळे बाहेर रस्त्यांवर शुकशुकाट होता. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या दाणाबाजार, सुभाष चौक, सराफ बाजारात तर इतिहासात पहिल्यांदा सकाळी शुकशुकाट पाहायला मिळाला.