तालिबानी राजवटीचा भारताला फटका बसणार?; पाहा, काय म्हणाले अविनाश धर्माधिकारी?
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबानी संघटनेने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं आहे. यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी पळ काढत देश सोडला. तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर देशात एक अस्थिरतेचं, गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. ही सर्व परिस्थिती पाहता भारत-अफगाणिस्तानची भविष्यातील वाटचाल कशी होणार? भारताला तालिबानी राजवटीचा फटका कसा बसणार? या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने माजी माजी सनदी अधिकारी, आतंरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि चाणक्य मंडल परिवार या स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी भारतातील दहशतवाद जोपासण्यासाठी पाकिस्तान अन् तालिबान एकत्र मिळून काम करतील, असं मत व्यक्त केली. यासह भविष्यात अनेक विषयांवर चर्चा केली. पाहा, ते काय म्हणाले?