Pune MNC Corona Rules : दोन डोस घेतले असेल तरच मनपात प्रवेश; पुणे मनपाचा निर्णय - पुणे कोरोना नियमावली
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराच्या निर्देशानुसार महापालिकेच्यावतीने आजपासून पुणे महापालिका ( Pune MNC Rule on Corona ) आणि क्षेत्रीय कार्यालयात ज्या नागरिकांची कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशाच नागरिकांना प्रवेश देण्यात येत आहे. तसेच महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची अँटीजेन टेस्टदेखील ( Anitgen Test in Pune MNC ) करण्यात येत आहे. नागरिकांनी आपली महापालिकेशी संबंधित कामे ऑनलाईनच्या माध्यमातून करावीत आणि कमीत कमी गर्दी करावी, असे आवाहनही महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा.