...अन् शेतकऱ्यांनी दीड एकरमधील मिरचीची शेती केली उद्ध्वस्त - भाव न मिळत असल्याने मिरचीची शेती केली उद्ध्वस्त
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13043999-227-13043999-1631452748533.jpg)
येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील अंदरसूल येथील शेतकरी रघुनाथ जगताप व नवनाथ जगताप यांनी आपल्या दीड एकर शेतीत लावलेली मिरचीचे पीक स्वत:च उद्ध्वस्त केली आहे. मिरचीला मिळणार कवडीमोल भाव यामुळे या शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. पिकासाठी लावलेला खर्चही निघत नसल्याने हे पाऊल उचलावे लागत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मायबाप सरकारने शेतकऱ्यांकडे जातीने लक्ष घालावे, अशी विनंतीही शेतकरी रघुनाथ जगताप व नवनाथ जगताप यांनी केली आहे.