पुण्यात मिनी लॉकडाऊनमुळे कामगारांची वाटचाल पुन्हा घराकडे
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लावण्यात आले आहे. पुण्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या शिवाय जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे पुण्यात आता लॉकडाऊन सदृश्य स्थिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रोजगार हिरावला गेल्यामुळे परप्रांतीय कामगारांनी आपल्या गावाची वाट धरल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर गावी जाण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. पुण्यात हॉटेल व्यावसायिकांना फक्त डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांनी कामगारांना घरी जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी पुन्हा एकदा गावाकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर धाव घेतली आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर परप्रांतीय कामगारांची मोठी गर्दी उसळली होती. या सर्वांचा आढावा घेतला ईटीव्हीचे प्रतिनिधी किरण शिंदे यांनी..