संयम सोडायला लावू नका, अन्यथा ही लढाई अत्यंत वाईट मार्गावर जाईल - संजय राऊत - शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13516978-thumbnail-3x2-raut.jpg)
मुंबई : अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिकांनी ज्यांच्यावर आरोप लावले त्यांनीच यावर बोललेलं बरं असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. आता शरद पवार यांनाही यात ओढलं जात आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे. राजकीय हमाम में सब नंगे है. आम्ही संयम बाळगून आहोत, तो सोडायला लावू नका. अन्यथा ही लढाई अतिशय वाईट मार्गावर जाईल अशी टीका राऊत यांनी केली आहे. अजुनही संधी आहे, त्यांनी सुधारले पाहिजे असे ते म्हणाले. जिनके घर शिशे के होते है, वह दुसरो के घरोंपर पत्थर नही फेंकते असेही राऊत म्हणाले. फडणवीस जर पत्रकार परिषद घेत असतील तर त्यांनी यावर बोलले पाहिजे. केंद्रीय यंत्रणांचा गैवापर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रात जणू काही गांजाची शेती पिकत आहे असे चित्र उभे केले जात आहे. नवाब मलिकांच्या भावना मी समजू शकतो. गेल्या काही महिन्यांत त्यांनी बरच भोगलंय. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत असेही राऊत म्हणाले. हिंदूंना सर्व धर्म पवित्र आहेत. ते सर्व धर्मांचं संरक्षण करतात. मोदी इटलीला गेले, त्यांनी पोप यांना इथं बोलावलंय, त्यांचं स्वागतच आहे असेही राऊत म्हणाले. तर दादरा नगर हवेलीत शिवसेनेचाच खासदार विजयी होईल याची आम्हाला खात्री आहे. उद्या तिथले खासदार मुंबईत विजयी जल्लोष करण्यासाठी येतील, याची आम्हाला खात्री आहे असे राऊत म्हणाले.