Disease on Onion Crop in Yeola : शेतकऱ्यांने एक एकर कांद्याच्या पिकावर फिरवला रोटावेटर - कांद्याच्या पिकावर फिरवला रोटावेटर
🎬 Watch Now: Feature Video
येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील बल्हेगाव येथील शेतकरी भाऊसाहेब सोमासे यांनी एक एकर कांदा पिकाची लागवड केली होती. मात्र अवकाळी पाऊस व दाट धुक्यामुळे कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव ( Disease on Onion Crop in Yeola ) वाढल्याने अक्षरशः संतप्त शेतकऱ्यांने कांदा पिकावर रोटावेटर मारून ( Farmer rotate onion crop) कांदा पीक नष्ट करून टाकले आहे. सतत एक ना एक संकटाला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत असल्याने आता कांदा पीक नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या शेतकऱ्याने एक एकर कांदे लावले होते. त्याकरीता 60 हजार रुपये खर्च आला होता. मात्र सततच्या बदलत्या हवामानामुळे या उभ्या कांदा पिकावर करपा तसेच मावाचा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने कांद्याचे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने अक्षरशा या कांदा पिकावर रोटावेटर मारण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.