VIDEO :...अन् देवेंद्र काकांनी पुरविला लहान मुलीचा हट्ट - Devendra Fadnavis call to Prachiti
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - तुम्ही जर देवेंद्र फडणवीस काकांकडून मला ‘हॅप्पी बर्थडे’चा फोन करणार असाल तरच बैठकीला जा, नाहीतर जाऊ नका! हा एका लहान मुलीचा हट्ट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला ( Devendra Fadnavis Video Call to Little Girl ) आहे. कोकण विभागातील विविध जिल्ह्यांच्या भाजपाच्या आढावा बैठकी मुंबईत होत्या. दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठे ( Kedar Sathe ) सुद्धा या बैठकीला निमंत्रित होते. पण त्यांची मुलगी प्रचितीचा वाढदिवस असल्याने तिने बाबांना बैठकीला जाऊ नका, असा हट्ट केला. पक्षाची बैठक महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांनी मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, प्रचितीनेही वेगळाच हट्ट केला. जर देवेंद्र फडणवीस काका मला शुभेच्छा देणार असतील, तरच मी परवानगी देईन. केदार साठे यांनी वचन दिले आणि मगच ते बैठकीला येऊ शकले. बैठक झाल्यानंतर केदार साठे यांनी हा किस्सा देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर टाकला आणि या फडणवीस यांनी लगेचच प्रचितीशी संवाद संवाद साधला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत ( Devendra Fadanvis Viral Video ) आहे.