अनिल परब यांनी भ्रष्टाचार केलाय, त्यांना जेलमध्ये टाका - आमदार रवी राणा - अनिल परब ईटी नोटीस
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती : शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना काल ईडीने नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना संघर्ष पेटला आहे. त्यातच आता बडनेराचे आमदार रवी राणा यांनीही परब यांच्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. 'शिवसेनेचे आमदार व मंत्री ईडीच्या घेऱ्यात आहेत. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्याकडे धनाढ्य संपत्ती आहे. त्यामुळे अनिल परब यांना जेलमध्ये टाकून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे' अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली. तसेच, 'अनिल परब यांना कायद्याचा विसर पडला आहे. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेत असतानाच गोपनीयतेचीही शपथ घेतली आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांच्या घरावर शिवसैनिक पाठवले, असे अनिल परब सांगतात. ते कायद्यात बसत नाही. अनिल परब यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यांना अटक केली पाहिजे' अशीही मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे.