ETV Bharat / entertainment

अर्जुन कपूर डेंजर लंका ते जॅकी श्रॉफ बब्बर शेरपर्यंत 2024मधील सर्वात घातक खलनायक - DEADLIEST VILLAIN

2024मध्ये या पाच अभिनेत्यांनी खलनायक बनून लोकांना आश्चर्यचकित केलं. आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यात खलनायकांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.

Deadliest villain of 2024
2024cमधील सर्वात घातक खलनायक (Movies posters)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 29, 2024, 11:08 AM IST

मुंबई : 2024 वर्ष संपायला फक्त दोन दिवस उरले आहेत. नवीन वर्ष 2025चं स्वागत करण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. 2024 हे वर्ष मनोरंजनाच्या दृष्टीनं हिट वर्ष ठरलंय. चालू वर्षात हिंदी आणि साऊथमधील दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. याशिवाय चालू वर्षात, काही असे कलाकार आहेत, ज्यांनी खलनायकाच्या भूमिकेत पडद्यावर धमाल केली. 2024च्या टॉप 5 खलनायकांबद्दल जाणून घेऊया.

डेंजर लंका : नायक म्हणून बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला अभिनेता अर्जुन कपूरनं खलनायक बनून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. रोहित शेटच्या कॉप ॲक्शन चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये, अर्जुन कपूरनं खलनायक डेंजर लंकाची भूमिका केली होती. या चित्रपटात अजय देवगण, टायगर श्रॉफ,अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांनी मुख्य भूमिकेत काम केलं आहे. 'सिंघम अगेन' हा 2024च्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर अंदाजे 390 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

सरकटा : चालू वर्षाच्या 11 ऑगस्टला रिलीज झालेल्या 'स्त्री 2' या हॉरर कॉमेडी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. श्रद्धा कपूर, राजकुमार आणि पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलं होतं. याशिवाय प्रेक्षकांना घाबरवण्याचे काम 'सरकटा'नं केलं होत. या चित्रपटामध्ये खलनायकची भूमिका सुनील कुमार यांनी केली होती. सुनील कुमार यांनी यापूर्वी देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय, मात्र त्यांना खरी ओळख 'स्त्री 2'मधून मिळाली. सुनील कुमार, अंदाजे 7 फूट उंच, पोलीस हवालदार आहेत. दरम्यान 'स्त्री 2' हा 2024 मधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

वनराज कश्यप : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाेकृष्ट अभिनेता आर. माधवननं अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चालू वर्षात प्रदर्शित झालेल्या हॉरर चित्रपट 'शैतान'मध्ये त्यानं खलनायकाची भूमिका करून सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित केलं होतं. अजय देवगण आणि ज्योतिका स्टारर 'शैतान' चित्रपटात आर. माधवननं ब्लॉक मॅजिक करणाऱ्या वनराज कश्यपची भूमिका केली होती. 'शैतान' हा गुजराती चित्रपट 'वश'वर आधारित आहे. 'शैतान' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सुमारे 200 कोटींहून अधिक कमाई केली होती.

सुप्रीम यास्किन : 'पुष्पा 2'च्या आधी, प्रभास स्टारर चित्रपट 'कल्की 2898 एडी' हा 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. ज्यानं जगभरात 1100 कोटींची कमाई केली आहे. साउथ सुपरस्टार कमल हासननंया मल्टीस्टारर चित्रपटात खलनायक सुप्रीम यास्किनची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील कमल हासनची भूमिका आणि लूक हे थरारक होतं. नाग अश्विननं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.'कल्की 2898 एडी' चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांसारखे मोठे बॉलिवूड स्टार देखील दिसले आहेत.

बब्बर शेर : 'बेबी जॉन' चित्रपटात जॅकी श्रॉफ हे खलनायक बनून प्रेक्षकांना घाबरवत आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ हे खलनायक बब्बर शेरच्या भूमिकेत आहे. 25 डिसेंबरच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणाऱ्या 'बेबी जॉन' चित्रपटात वरुण धवन नायकाच्या भूमिकेत आहे. रुपेरी पडद्यावर 'बेबी जॉन' चित्रपटाला फारसा पसंती मिळत नसला, तरी खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ पडद्यावर प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत आहे. 'बेबी जॉन'नं तीन दिवसांत फक्त 19.65 कोटींचा व्यवसाय केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.