लाहोर New Zealand Wins Tri-Series : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड क्रिकेट संघात तिरंगी मालिका खेळवण्यात आली. ज्याचा अंतिम सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झाला, यात न्यूझीलंडनं पाच विकेट्सनं सहज विजय मिळवला. तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यातही पाकिस्तानी संघाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. अशा परिस्थितीत, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, त्यांना घरच्या मैदानावर वाईट पराभवाचा सामना करावा लागला. तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचे गोलंदाज आणि फलंदाजही निष्प्रभ ठरले.
New Zealand cruise past Pakistan to clinch the Tri-Series title 🏆#PAKvNZ 📝: https://t.co/1AGfEbGry3 pic.twitter.com/O5ujDG4AkU
— ICC (@ICC) February 14, 2025
पाकिस्तानची खराब सुरुवात : अंतिम सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवाननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. त्यांचा प्रथम फलंदाजी करण्याचा त्याचा निर्णय उलटा ठरला. पाकिस्तानचा कोणताही फलंदाज सातत्यपूर्ण फलंदाजी करु शकला नाही. संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा फखर झमान (10 धावा) आणि सुपरस्टार फलंदाज बाबर आझमला फक्त 29 धावा करता आल्या. पाकिस्ताननं फक्त 53 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या.
ODI Tri-Series winners! 🏆
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 14, 2025
Daryl Mitchell (57), Tom Latham (56) and Devon Conway (48) steer the team home in Karachi. Focus now shifts to the ICC Champions Trophy 2025 opener against Pakistan on Wednesday. Catch up on all scores | https://t.co/9nrmPVXcon 📲 #3Nations1Trophy pic.twitter.com/lXWYi8PqWx
पाकिस्तानी संघ पूर्ण 50 षटकंही खेळू शकला नाही : सुरुवातीच्या तीन विकेट झटपट पडल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सलमान अली आगा यांनी धावा काढण्याची जबाबदारी घेतली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रिझवाननं 46 धावा केल्या आणि सलमाननं 46 धावा केल्या. तय्यब ताहिरनं 38 धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. परिणामी पाकिस्तानी संघ पूर्ण 50 षटकंही खेळू शकला नाही आणि फक्त 242 धावांवर सर्वबाद झाला.
Tom Latham reaches 50 for the 32nd time in ODI cricket. Helping steer the team to victory in Karachi 🏏 #3Nations1Trophy #CricketNation pic.twitter.com/UK0mJfWTWV
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 14, 2025
विल्यम ओ'रोर्कच्या चार विकेट्स : न्यूझीलंडकडून विल्यम ओ'रोर्क सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 43 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या खेळाडूंनी पाकिस्तानी फलंदाजांना हात उघडण्याची संधी दिली नाही. तर फलंदाजीत डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल आणि टॉस लॅथम हे न्यूझीलंडसाठी सर्वात मोठे हिरो ठरले. न्यूझीलंडला सामना जिंकण्यास मदत करण्यात या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. मिशेलनं सर्वाधिक 57 धावा केल्या. तर लॅथमनं 56 धावांचं योगदान दिलं. पाकिस्तानचे गोलंदाज खूपच अपयशी ठरले. अबरार अहमदनं 10 षटकांत 67 धावा दिल्या. तर सलमान अली आगानं 10 षटकांत 45 धावा दिल्या.
Will O'Rourke's magnificent 4-wicket haul powers New Zealand to Tri-Series glory 🙌#PAKvNZ 📝: https://t.co/1AGfEbGry3 pic.twitter.com/uHr5pAPcT6
— ICC (@ICC) February 15, 2025
कीवींविरुद्ध खेळायचा पहिला सामना : तिरंगी मालिकेत पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यासह दोन सामने गमावावे लागले. तर पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. अशा परिस्थितीत दोन सामने गमावणे हे त्याच्यासाठी अजिबात चांगलं लक्षण नाही.
हेही वाचा :