ETV Bharat / technology

शाओमी 15 आणि 15 अल्ट्राच्या ग्लोबल लाँचची तारीख जाहीर, स्नॅपड्रॅगन 8 एलिट चीपसह मिळतील दमदार फीचर - XIAOMI 15 AND 15 ULTRA LAUNCH

शाओमी 15 आणि 15 अल्ट्रा 2 मार्च रोजी जागतिक बाजारपेठेत लॉंच होणार आहे. या दोन्ही फोनमध्ये काय असेल खास जाणून घ्या...

Xiaomi 15 and 15 Ultra
शाओमी 15 आणि 15 अल्ट्रा (Xiaomi)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 15, 2025, 10:05 AM IST

हैदराबाद : बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर, शाओमीनं अधिकृतपणे शाओमी 15 आणि शाओमी 15 अल्ट्रा स्मार्टफोन्सच्या जागतिक लाँच तारखेची घोषणा केली आहे. दोन्ही फोन 2 मार्च रोजी जागतिक बाजारपेठेत दाखल होतील. शाओमी 15 अल्ट्रा बद्दलच्या लीक्सनंतर ही घोषणा करण्यात आलीय.

2 मार्च रोजी जगभरात लाँच बार्सिलोना येथे झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये (MWC) शाओमीनं त्यांचे फ्लॅगशिप फोन लाँच करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. थोडक्यात सांगायचं तर, शाओमी 15 मूळतः गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये लाँच झाला होता, म्हणजेच तो जवळजवळ सहा महिन्यांनंतर जागतिक स्तरावर लॉंच होतोय. दुसरीकडं, शाओमी 15 अल्ट्रा 22 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये लाँच होईल आणि त्यानंतर 2 मार्च रोजी जगभरात लाँच होईल.

Xiaomi 15
शाओमी 15 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चीप आहे, जी 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह येते. यात 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 300 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 2670×1200 रिझोल्यूशन आणि 3200 निट्सची पीक ब्राइटनेस, 6.36-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले आहे. कॅमेऱ्यांसाठी, यात 50 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स आणि मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड सेन्सर आहे. 32 मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी देण्यात आला आहे. हा फ्लॅगशिप हा HyperOS 2 सह Android 14 वर चालतो. अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये 5G, 4G, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, NFC, USB 3.2, IR ब्लास्टर, ड्युअल स्पीकर्स, अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर, IP68 रेटिंग आणि बरेच काही समाविष्ट आहे. डिव्हाइसला पॉवर देणारी 5,400 एमएएच बॅटरी आहे, जी 90 वॅट वायर्ड आणि 50 वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Xiaomi 15 Ultra
Xiaomi 15 Ultra मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 2K रिझोल्यूशनसह 6.78-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले आहे. यात Qualcomm Snapdragon 8 Elite SoC, 16GB पर्यंत RAM आणि 512GB स्टोरेज असेल. ऑप्टिक्सच्या बाबतीत, फोनच्या मागील बाजूस क्वाड-कॅमेरा सेटअप असण्याची चर्चा आहे, ज्यामध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा, 50MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा, 50MP चा 3X टेलिफोटो लेन्स आणि 200MP चा वेगळा टेलिफोटो कॅमेरा असेल. Xiaomi 15 प्रमाणे यात, 32MP कॅमेरा सेल्फीसाठी असेल. अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये 5G, 4G कनेक्टिव्हिटी, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, NFC, USB 3.2, IR ब्लास्टर, ड्युअल स्पीकर्स, अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर, IP68 रेटिंग आणि बरंच काही समाविष्ट आहे. यात 90W वायर्ड आणि 80W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,410mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे.

हे वाचलंत का :

  1. व्हॅलेंटाईन्स डे निमित्त OnePlus Nord CE 4 सह iPhone वर मोठी सूट
  2. JioCinema आणि Disney+ Hotstarचं विलीनीकरण, JioHotstar सबस्क्रिप्शन प्लॅनची ​​माहिती
  3. एआय, सेमीकंडक्टर्स, क्वांटम कम्प्युटिंग, सेमीकंडक्टर्स क्षेत्रात भारत अमेरिका सहकार्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.