बुलावायो Wicketless Day in Test Cricket : 2024 हे वर्ष आता संपणार आहे आणि सरत्या वर्षाच्या शेवटी क्रिकेट विश्वात कसोटी क्रिकेटचा धुमाकूळ सुरु आहे. तीन बॉक्सिंग-डे कसोटी सामने एकाच वेळी खेळले जात आहेत. तिन्ही कसोटी सामने 26 डिसेंबरपासून सुरु झाले आणि आता तिन्ही कसोटी सामने रोमांचक वळणावर पोहोचले आहेत.
End of a dominating day for Afghanistan! 🙌@RahmatShah_08 (231*) and the skipper @Hashmat_50 (141*) put on a fantastic batting effort and ensured that Afghanistan didn't lose a single wicket on the entire day 3, going into the stumps with 425/2 runs on the board, trailing… pic.twitter.com/sAV0PJMSrP
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 28, 2024
सर्व बॉक्सिंग-डे कसोटी रोमांचक वळणावर : मेलबर्न इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीश कुमार रेड्डीनं वॉशिंग्टन सुंदरसोबत 127 धावांची शानदार भागीदारी केली आणि त्यानंतर कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावून अनेक विक्रम केले. या शतकामुळं भारताला तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 358/9 धावा करता आल्या. मेलबर्नशिवाय सेंच्युरियनमध्येही दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा बॉक्सिंग-डे कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना रोमांचक टप्प्यात पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 121 धावांची गरज असून त्यांच्या 7 विकेट शिल्लक आहेत.
𝐎𝐧𝐞 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐑𝐞𝐜𝐨𝐫𝐝 𝐁𝐨𝐨𝐤𝐬! 📚@RahmatShah_08 and @Hashmat_50's 361* runs partnership is the highest stand for any wicket in test cricket for Afghanistan. 🙌🤝#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/147KCA5xW4
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 28, 2024
अफगाणिस्तानला इतिहास रचण्याची संधी : मेलबर्न आणि सेंच्युरियन व्यतिरिक्त तिसरी बॉक्सिंग-डे कसोटी झिम्बाब्वेच्या भूमीवर खेळली जात आहे. या सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत सुरु आहे. पहिल्या 2 दिवसात फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 3 फलंदाजांच्या शतकांच्या मदतीनं कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या उभारली. झिम्बाब्वेनं पहिल्या डावात 586 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननंही रहमत शाह आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या शानदार खेळीच्या जोरावर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 गडी गमावून 425 धावा केल्या.
Powered by Rahmat Shah and Hashmatullah Shahidi, Afghanistan forge a strong response to Zimbabwe 🏏#ZIMvAFG 📝: https://t.co/Q2qLQiEMHD pic.twitter.com/riO3or74Io
— ICC (@ICC) December 28, 2024
The run-fest in Bulawayo continued with Rahmat Shah and Hashmatullah Shahidi forging a marathon partnership 🤝#ZIMvAFG 📝https://t.co/h4J3xasDJz pic.twitter.com/Fk7ZoZWqUw
— ICC (@ICC) December 29, 2024
तिसऱ्या दिवशी अनोखा विक्रम : रहमत शाह 231 धावा करुन नाबाद माघारी परतला आणि हशमतुल्ला शाहिदीनं 141 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी 361 धावांची भागीदारी झाली. या दोघांनी तिसऱ्या दिवशी तिसऱ्या विकेटसाठी 330 धावांची भागीदारी केली. अशाप्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला गेला. खरं तर, झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान बॉक्सिंग-डे कसोटीत, तिसऱ्या दिवशी 300 हून अधिक धावा झाल्या आणि एकही विकेट पडली नाही.
𝟑𝟎𝟎 𝐑𝐮𝐧𝐬 & 𝐆𝐨𝐢𝐧𝐠 𝐒𝐭𝐫𝐨𝐧𝐠! 💯💯💯@RahmatShah_08 (195*) and @Hashmat_50 (118*) continue to go strong as they share 300 runs for the third wicket. 👏#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/owD9DYFMVD
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 28, 2024
5 वर्षांनी झाली इतिहासाची पुनरावृत्ती : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी अनोखी घटना तब्बल 5 वर्षांनी पाहायला मिळाली आहे. यापूर्वी, जानेवारी 2019 मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी असं दृश्य दिसलं होते. त्या सामन्यात तिसऱ्या दिवशी 300 हून अधिक धावा झाल्या पण एकही विकेट पडू शकली नव्हती. तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी 26वी वेळ आहे.
The skipper @Hashmat_50 followed Rahmat Shah's footsteps and brought up his 2nd Hundred in Test cricket, and his both test hundreds are now against Zimbabwe. 👏
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 28, 2024
Top knock, skipp! 👍#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/c8W9O1XNTM
हेही वाचा :