PUNE MIDC FIRE INCIDENT : डीएनए चाचणीनंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात येईल - डॉ.अभिनव देशमुख - PUNE MIDC FIRE INCIDENT DEADBODY
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12055437-thumbnail-3x2-k.jpg)
पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुड येथील उरवडे येथील एसव्हीएस कंपनीत काल लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला. आग खूप मोठ्या प्रमाणात असल्याने मृत झालेल्या कामगारांची ओळख पटवणे खूप कठीण जात आहे. यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा डीएनए चाचणी करुनच मृतदेह ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. तसेच याबाबतची प्रक्रियाही सुरू झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.