भाजपच्या मानसिकतेचा विचार करण्याची गरज आहे - नाना पटोले - nana patole
🎬 Watch Now: Feature Video
अकोला - पंजाब येथील काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानला जात आहेत. यावरून त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून टीक होत आहे. यावरुन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या मानसिकतेचा विचार करण्याची गरज आहे, अशा शब्दात भाजपवर टीका केली आहे. स्वतः केले ते बरोबर आणि दुसऱ्यांनी केले ते चुकीचे अशी भाजपची मानसिकता झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोटोकॉल न पाहता पाकिस्तानच्या विमानतळावर आपला विमान उतरवला होता. या घटनेची जागतिक पातळीवर चेष्टा झाली होती. गुरू गोविंदसिंग यांचे मोठे धर्मपीठ हे पाकिस्तान येथे आहे. तिथे कार्यक्रम सुरू आहे. त्या धार्मिक कार्यक्रमाला देशातील शीख या कार्यक्रमाला जातात. म्हणून सिद्धू जात आहे आणि ते वावगे आहे, असे ते म्हणत असतील तर भाजपच्या मानसिकतेच्या विचार करण्याची गरज आहे, असे पटोले म्हणाले.