VIDEO : कोरोनाचा परिणाम; ऑनलाईन राखी खरेदीकडे नागरिकांचा कल जास्त - citizens prefering online rakhi purshasing pune
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - सध्या बाजारात रक्षाबंधनानिमित्त विविध प्रकारच्या राख्या बघायला मिळत आहेत. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची गंभीरता लक्षात घेता नागरिकांचा ऑनलाईन राखी खरेदीकडे जास्त कल बघायला मिळत आहे. याआधी राखी तयार करण्यासाठी चीनचा माल वापरला जायचा. मात्र, आता हा माल आता दुसरीकडून मागवला जात आहे. त्यामुळे यावर्षी राखीच्या किमतीत वाढ झाली आहे. याबाबत उद्योजिका भावना छाजेड यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला. सध्या बाजारात विविध प्रकारच्या राखी आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये कुंदन राखी, सिल्वर राखी, गोल्डन राखी, चंदन राखी, रुद्राक्ष राखी, लहान मुलांसाठी अव्हेंजर राखी कीट, भैया भाभी राखी, ब्रेसलेट राखी अशा विविध प्रकारच्या राखीला सध्या बाजारात मागणी आहे. तर काही उद्योजिका ह्या घरातूनच या राखी खरेदी विक्रीचा बिझनेस करत आहेत.
Last Updated : Aug 20, 2021, 9:20 AM IST