मुंबई - बॉलिवूड स्टार सनी देओलनं 15 जानेवीर रोजी लष्कर दिन साजरा केला आणि भारतीय सैन्याच्या शैर्याला. धैर्याला, त्यागाला आणि समर्पणाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. लष्कार दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सैन्याच्या कार्यक्रमात सनीनं भाग घेतला. आपला वेळ सैनिकांबरोबर घालवताना त्यानं देशाच्या रक्षकांच्या शौर्याला सलाम केला. सनी देओलनं इंस्टाग्रामवर त्यांच्या भेटीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केलो आहेत. एका व्हिडिओमध्ये, सनी आणि सैनिक "भारत माता की जय" अशा घोषणा देताना दिसतात.
इतर काही फोटोत तो सैनिकांच्या बरोबर संवाद साधताना, त्याच्याशी मजा मस्ती करताना दिसत आहे. या भेटीत त्यानं जवानांबरोबर फोटो काढले आणि कुस्तीही खेळली. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, "तेव्हा, आता आणि कायमचे. आपल्या वीरांच्या धैर्याला, त्यागाला आणि अढळ समर्पणाला सलाम. भारतीय सैन्य दिनाच्या शुभेच्छा! हिंदुस्तान जिंदाबाद."
भारतीय सैन्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या वर्षी भारतीय सैन्याच्या वतीनं ७७ वा सैन्य दिन साजरा करण्यात आला. या समारंभाला सनी देओल पाहुणा म्हणून आल्यानं जवानांना आनंदा झाल्याचं पाहायला मिळालं.
कामाच्या आघाडीवर सनी देओल त्याच्या बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. जानेवारी २०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात दिलजीत दोसांझ, वरुण धवन आणि अहान शेट्टी यांच्यासह अनेक कलाकार दिसतील.अनुराग सिंग दिग्दर्शित १९९७ मध्ये गाजलेल्या आयकॉनिक बॉर्डर चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. यामध्ये सनी देओल पुन्हा एकदा त्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना अॅक्शन-पॅक्ड, देशभक्तीपर सिनेमॅटिक अनुभव देणारा असेल.