मुंबई : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचा आगामी चित्रपट 'पंजाब 95' रिलीज होण्यापूर्वीच वादाचा बळी ठरला. गेल्या दोन वर्षांपासून हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे, मात्र वारंवार या चित्रपटाच्या रिलीजमध्ये अडचणी येत आहेत. आता अलीकडेच दिलजीतनं या चित्रपटामधील त्याचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले होते. यानंतर अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहेत. हा चित्रपट अखेर यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. 'पंजाब 95' हा चित्रपट मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालडा यांच्या जीवनावर आधारित आहे.
दिलजीत दोसांझचं 'पंजाब 95' चित्रपटातील लूक : 'पंजाब 95' चित्रपटामधील पोस्टरमध्ये दिलजीत दोसांझ हा जमिनीवर बसलेला दिसत असून त्याचा संपूर्ण चेहरा रक्ताळलेला दिसत आहे. याशिवाय तो तुरुंगात बसलेल्याचा दिसत आहे. दिलजीत दोसांझनं चित्रपटातील दमदार फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'पंजाब 19'चा टीझर 17 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे, अंधाराला आव्हान देणे.' आता दिलजीतच्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत असून त्याचे कौतुक करत आहेत.
जसवंत सिंग खालडा कोण होते? : रिपोर्ट्सनुसार, ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान, पंजाब पोलिसांवर शस्त्र नसलेल्या संशयितांना मारण्याचा आणि हत्या लपविण्यासाठी मृतदेह जाळण्याचा आरोप होता. या काळात, जसवंत सिंग खालडा यांनी चार खटल्यांवर पुरावे गोळा केल्याचं काम केलं होतं. जसवंत सिंग खालडा हे अमृतसरमधील एका बँकेचे संचालक होते. शीख दंगलींनंतर पंजाब पोलिसांनी हजारो तरुण शीखांच्या हत्या आणि त्यांचे अंत्यसंस्कारांवर केले होते. याशिवाय काहीजणाचे अपहरण देखील केले होते. इतक्या लोकांचा मृत्यू कसा झाला हे सस्पेन्स होतं. मात्र जसवंत सिंग खालडा यांनी यावर आपला शोध सुरू ठेवला होता. सप्टेंबर 1995मध्ये पंजाब पोलिसांनी जसवंत सिंग खालडा यांना ताब्यात घेऊन त्यांचा छळ केला होता. यानंतर त्यांचा मृत्यू कसा झाला याबद्दल काहीही माहित झाले नाही. सप्टेंबर 2024 मध्ये, सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी सुधार समितीबरोबर 'पंजाब 95' पाहिला आणि त्यांनी या चित्रपटाला 120 दृश्यामध्ये बदल करण्यास सांगितले. याशिवाय जसवंत सिंग खालडा यांच्या पात्राचे नावही बदलण्यास सांगितले आहे. यानंतर निर्मात्यांनी सीबीएफसीला सांगितलं की, ते चित्रपटातील जसवंत सिंग खालडा हे नाव बदलू शकत नाहीत. खालडा यांना शीख समुदाय शहीद मानले जाते. खालडा यांची पत्नी परमजीत कौर यांनी 2022मध्ये कुटुंबासह हा चित्रपट पाहिला होता आणि त्यांनी प्रदर्शनासाठी परवानगी दिली होती. आता त्यांनी चित्रपटातील 120 कटांविरुद्ध आवाज उठवला आहे. कोणत्याही कटशिवाय हा चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा :