कुर्ला बलात्कार प्रकरण : मुंबई जंगलराजच्या दिशेने, चित्रा वाघ यांचा सरकारवर घणाघात
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईतील कुर्ला येथील घडलेली घटना अतिशय अमानुष आहे. कुर्ला येथे एका २० वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे. तिचा मृतदेहही अद्याप त्या ठिकाणी बेवारस स्थितीत असल्याचा आरोप भाजपा नेत्या चित्रा वाघ (bjp leader chiutra wagh ) यांनी केला आहे. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. मुंबई आता जंगलराजच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार मुंबईतील नाईटलाइफबद्दल जितकी काळजी आणि आस्था दाखवते, तितकी काळजी महिलांच्या सुरक्षिततेबाबत का घेत नाही? असा सवालही चित्रा वाघ यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे.