VIDEO : ठाण्यात भरधाव गाडीने घेतला पेट; कोणतीही जीवितहानी नाही - गाडीने घेतला पेट
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - ठाण्यात भरधाव चारचाकी गाडीने अचानक पेट घेतल्याचा प्रकार माजीवडा येथे घडला आहे. ठाणे भिवंडी महामार्गावरील भिवंडीच्या दिशेने कार जात होती. गाडी पेट घेतल्यानंतर चालकाने गाडीबाहेर घेतली. सुदैवाने कोणतीतही जीवितहानी झाली नाही. मात्र चारचाकी गाडी जळून खाक झाली आहे. या प्रकारामुळे ठाणे भिवंडी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे अग्निशमन दलाने ही आग विझवली असली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.