Raid on Ration Shop Mumbai : मुंबईत रेशनचा काळाबाजार; 24 लाखांचा माल जप्त, 20 जणांना अटक - स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या विक्री

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 18, 2021, 10:44 AM IST

Updated : Dec 18, 2021, 10:51 AM IST

मुंबई - रेशन दुकानातील गरिबांसाठी असलेल्या धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी आरे पोलिसांनी २०हून अधिक जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी 24 लाख रुपयांच्या गहू आणि तांदळाच्या गोण्या जप्त केल्या ( Raid on Ration Store Mumbai ) आहेत, अशी माहिती डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. गोरेगाव परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात स्वस्त धान्याचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्वस्त धान्य दुकानातील धान्य हे मुंबईच्या विविध भागांमध्ये अधिक दराने विकले जात होते. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा अरे परिसरामध्ये असलेल्या एका गोदामावर स्वस्त धान्य वितरण विभागाच्या मदतीने छापा टाकला. या छाप्याममध्ये पाच ट्रकसह तब्बल 25 लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त करण्यात आला आहे. हा सर्व साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणार होता, अशी माहिती डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी दिली.
Last Updated : Dec 18, 2021, 10:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.