BJYM Against Nana Patole : नाना पटोलेंची जीभ कापणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देणार : भाजपा युवा मोर्चाची घोषणा - Congress State President Nana Patole
🎬 Watch Now: Feature Video

जालना : महाराष्ट्रातून कुणीही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांची जीभ कापा आणि १ लाख लाख रुपये मिळवा, अशी घोषणा भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य ( Nana Patole Controversial Statement ) केल्याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात ( Kadil Jalna Police Station ) नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाने तक्रार दाखल केली ( BJYM Complaint Against Nana Patole ) आहे. तातडीने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असंही या तक्रारीत म्हटलं आहे. महाराष्ट्रात नारायण राणे यांच्यासाठी वेगळा कायदा आणि नाना पटोले यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का? असा सवाल देखील भाजपा युवा मोर्चाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.