आता थेट विधानसभेवर बैलगाडी घेऊन धडक - गोपीचंद पडळकर - gopichand padalkar and sadabhau khot
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12826198-thumbnail-3x2-jkk.jpg)
सांगली - बंदी असतानाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अखेर बैलगाडी शर्यती पार पाडून दाखवल्या. आता यापुढचा आंदोलन आता थेट विधानसभेवर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते म्हणाले, महात्मा फुले यांच्या जन्मगाव कटगुन या ठिकाणाहून लवकरच बैलगाड्यांचा भव्य पायी मोर्चा विधानसभेवर धडकेल. जोपर्यंत बैलगाडी शर्यतील परवानगी मिळत नाही तोपर्यंत ठिय्या मारून बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आज महाराष्ट्रातील बैलगाडी धारकांसाठी सोन्याचा दिवस ठरला आहे. 11 वर्षांपासून शेतकरी यासाठी लढा देत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन बैलगाडी शर्यतीला परवानगी देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. दोनही नेत्यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला. पाहा, ते काय म्हणाले?