BJP MLA Suspension Canceled : सत्यमेव जयते हीच माझी प्रतिक्रिया - प्रविण दरेकर - विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर मुंबई
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - 12 आमदारांचे निलंबन रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने निश्चितच आम्हाला दिलासा दिलेला आहे. या निर्णयाच्या संदर्भात सत्यमेव जयते अशाच प्रकारची प्रतिक्रिया उचित ठरेल. मला वाटते तीन पक्षाच्या बहुमताच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम हे सरकार करू पाहत होते आणि त्यांनी केले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारे तुम्हाला संविधानाचा लोकशाहीचा गळा घोटता येणार नाही. आमदार केवळ नागरिक नाही तर तीन लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे तुमची मनमानी चालणार नाही. नियमबाह्य पद्धतीने करता येणार नाही. कोणावरही अन्याय होणार नाही या भावनेतून अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.