तीन मंत्री अन् तीन जावई, असे अर्धा डझन फटाके दिवाळीनंतर फोडणार - किरीट सोमैया - फटाके दिवाळीनंतर फोडणार
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सगळे दिवाळीत फटाके फोडतात मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. तीन मंत्री आणि तीन जावई, असे अर्धाडझन जणांचे घोटळे बाहेर काढणार आहे, असे भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले. नवाब मलिक व संजय राऊत यांच्यामार्फत नवा वाद निर्माण करून घोटाळ्यांवर पडदा टाकण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत, असा आरोपही सोमैया यांनी केला आहे. मी 24 घोटाळे बाहेर काढले एका पाठोपाठ एक, अशा 18 जणांची चौकशी सुरू झाली आहे, त्याचे उत्तर द्या, असे आवाहन सोमैया यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केलाे आहे.