राम नवमी : आळंदीत फुलांच्या आराशीत श्रीरामाची प्रतिमा
🎬 Watch Now: Feature Video
आळंदी(पुणे) : राम नवमीच्या औचित्याने आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. विविधरंगी फुलांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची प्रतिमा या आराशीत साकारण्यात आली. गाभारा आणि समाधी स्थळ आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात नाहीये.