अकोला - गुन्हेगारांवर अंकुश बसविण्याकरिता पोलीस अधीक्षकांनी उपसले हद्दपारीचे हत्यार - Akola Superintendent of Police
🎬 Watch Now: Feature Video

अकोला - जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या गुन्हेगारीवर अंकुश बसवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या प्रभावी ठरत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर विविध कलमान्वये कारवाई केली आहे. जिल्ह्यातून जवळपास 234 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलाच वचक बसला आहे. अकोला पोलीस दलाने केलेल्या या कारवायांमुळे अकोला जिल्हा राज्यात एमपीडीए आणि हद्दपारनुसार कारवाई करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.