VIDEO : दीड वर्षानंतर चित्रपटगृह अखेर सुरू, तरुणांचा चांगला प्रतिसाद - फेम आयनोक्स चित्रपटगृह औरंगाबाद
🎬 Watch Now: Feature Video

औरंगाबाद - आजपासून चित्रपटगृह सुरू झाले असून पहिल्या दिवशी युवकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं दिसून आले. सकाळी नऊ वाजेपासून औरंगाबादच्या सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. कोविड नियमांचे पालन करून प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला. पहिल्या दिवशी युवकांनी चांगला प्रतिसाद दिला, गेल्या दीड वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध असले तरी सिनेमागृहात चित्रपट पाहण्याचा अनुभव म्हणवा तसा येत नव्हता. चित्रपट गृह सुरू झाल्याने आनंद व्यक्त होत असल्याचं मत युवकांनी व्यक्त केले. औरंगाबादच्या फेम आयनोक्स चित्रपटगृहाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी आढावा घेतला.
Last Updated : Oct 22, 2021, 6:22 PM IST