मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून, तेच निर्णय घेतील - एकनाथ शिंदे - new mumbai airport controversy
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12254811-594-12254811-1624584799727.jpg)
ठाणे - मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. मुख्यमंत्र्यांनी तीन पर्याय सुचवण्यास सांगितले होते. दि.बा. पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांचे योगदान कोणाला नाकारता येणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल देखील सांगण्याची गरज नाही. राज्यात आणि देशात त्यांच्याबद्दल जी काही भावना लोकांची आहे, ती सांगण्याची गरज नाही, दोन्ही मोठ्या व्यक्ती आहेत. सर्व संमतीने प्रश्न सुटला पाहिजे ही भावना सरकार तसेच मुख्यमंत्र्यांची देखील आहे. त्यांनाही काही पर्याय सांगितले आहे, दोन्ही मोठ्या व्यक्तींचा सन्मान राहिला पाहिजे अशा पद्धतीने मार्ग निघायला पाहिजे अशीच सगळ्यांची भूमिका आहे, असे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भाजप कार्यकारिणी, कोवीड संकट आहे, त्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी वापर करणे चुकीचे आहे, जे काही आहे ते तपासात निष्पन्न होईल. असेही त्यांनी स्पष्ट केले.