कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर, 52 बंधारे पाण्याखाली - कोल्हापूर पंचगंगा नदी न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने का होईना वाढ होत चालली आहे. सध्या पंचगंगा नदीने 34 फुटांची पाणी पातळी गाठली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट, तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. इशारा पातळी ओलांडायला केवळ 5 फूट बाकी आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्वच गावांना आता जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने पंचगंगा नदी घाट येथून पूर स्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे.