शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त 'दगडूशेठ' गणपतीला ५०० डाळिंबांचा नैवेद्य - दगडूशेठ गणपती पुणे लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12124741-thumbnail-3x2-ganpati.jpg)
पुणे - डाळिंबाचा महानैवेद्य...फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतीची आकर्षक आरास... आणि त्यामध्ये गाभा-यात विराजमान गणरायाचे विलोभनीय रुप शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभा-यात गणरायासमोर सुमारे ५०० डाळिंबांचा नैवेद्य दाखविण्यात आला. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे गाभा-यात या विषयाशी सुसंगत अशी आकर्षक पुष्पसजावट देखील करण्यात आली.