आर्चर म्हणतो, ''जोपर्यंत प्रेक्षक मैदानात येत नाहीत, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही'' - Jofra Archer on Fans
🎬 Watch Now: Feature Video
''दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी जोपर्यंत प्रेक्षक मैदानात येत नाहीत, तोपर्यंत मी या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. मागील आठ महिने खूप कठीण होते आणि आम्हाला प्रेक्षक मैदानावर येण्याबाबत फक्त आश्वासन दिले होते. परंतु असे काहीही झाले नाही'', असे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने म्हटले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिले दोन सामने चेन्नईत खेळवण्यात येणार आहेत. हे सामने प्रेक्षकांशिवाय खेळले जाणार होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही या निर्णयाला पाठिंबा दर्शविला होता. पण, सरकारने कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (टीएनसीए) दुसर्या कसोटीसाठी ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याचे ठरविले आहे.